वेळूकरांना हायकोर्टाचा पुन्हा दणका
By Admin | Updated: February 6, 2015 01:57 IST2015-02-06T01:57:48+5:302015-02-06T01:57:48+5:30
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ राजन वेळूकर यांच्या पात्रतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण मागणारा डॉ़ वेळूकर यांचा अर्ज उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळला़

वेळूकरांना हायकोर्टाचा पुन्हा दणका
मुंबई : विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ राजन वेळूकर यांच्या पात्रतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण मागणारा डॉ़ वेळूकर यांचा अर्ज उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळला़
असे स्पष्टीकरण देता येत नसल्याचे स्पष्ट करत न्या़ पी़ व्ही़ हरदास व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हा अर्ज फेटाळला़
डॉ़ वेळूकर यांच्या या पदी झालेल्या निवडीला ए़ डी़ सावंत व इतरांनी स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले आहे़ या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने निवड समितीने वेळूकर यांच्या निवडीचा फेरविचार करायला हवा, असा निकाल दिला़ या निकालाचे स्पष्टीकरण द्यावे, असा स्वतंत्र अर्ज डॉ़ वेळूकर यांनी केला होता़ तो न्या़ हरदास यांच्या खंडपीठाने फेटाळला़ त्यामुळे डॉ़ वेळूकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत़