कसोटी क्रिकेटसाठी सज्ज : स्टीव्हन स्मिथ

By Admin | Updated: May 9, 2014 00:27 IST2014-05-09T00:27:57+5:302014-05-09T00:27:57+5:30

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) च्या सातव्या सत्रात राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आॅस्ट्रेलियाचा युवा फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आपण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे़

Ready for Test Cricket: Steven Smith | कसोटी क्रिकेटसाठी सज्ज : स्टीव्हन स्मिथ

कसोटी क्रिकेटसाठी सज्ज : स्टीव्हन स्मिथ

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) च्या सातव्या सत्रात राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आॅस्ट्रेलियाचा युवा फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आपण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे़ तसेच, देशाच्या वन-डे संघातही जागा मिळविण्यास इच्छुक असल्याचे तो म्हणाला़ २४ वर्षीय स्मिथ म्हणाला, ‘‘जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी फिरकी गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती़ त्यानंतर फलंदाज म्हणून मला संधी मिळाली़ मात्र, तेव्हा मी फलंदाज म्हणून तयार नव्हतो़ आता मात्र बराच अनुभव आल्यामुळे मी फलंदाज म्हणून खेळण्यास सज्ज आहे़’’ स्मिथने पुढे सांगितले, की गत दोन वर्षांत माझ्या खेळात बराच बदल झाला आहे़ खेळाच्या तीनही प्रकारांत मी फलंदाजीत विशेष योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे़ कसोटी क्रिकेटसाठी मी सध्या सज्ज आहे; मात्र आता देशाच्या वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेत आहे़ बांगलादेशात झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आॅस्ट्रेलियन संघात स्थान मिळू शकले नाही; मात्र आता उत्कृष्ट खेळाच्या बळावर तीनही संघांत स्थान मिळवीन, असा विश्वास त्याने व्यक्त केला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Ready for Test Cricket: Steven Smith