पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 05:42 IST2018-12-03T05:42:38+5:302018-12-03T05:42:40+5:30
लोककलावंत विठाबाई नारायणगावकर पुरस्कारासाठी निवड समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहे.

पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना
मुंबई : लोककलावंत विठाबाई नारायणगावकर पुरस्कारासाठी निवड समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या समितीच्या शासकीय सदस्यांमध्ये अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव, तर सदस्य सचिव म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक असणार आहेत.
अशासकीय सदस्यांमध्ये नारायणगावचे दत्तोबा फुलसुंदर, पुण्याच्या लता पुणेकर, जयमाला इनामदार, मुंबईचे प्रकाश खांडगे, धुळ््याचे भिमराव तातोराम गोपाळ, पुण्याचे विद्याधर जिंतीकर आणि मुंबईच्या श्यामल गरुड यांचा समावेश आहे.