Join us  

चौपाट्यांवर पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य; माणसांनी टाकलेली घाण समुद्राकडून साभार परत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 4:40 AM

भरतीच्या वेळी मुंबईलगतच्या समुद्रात दुपारी ४.८३ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या

मुंबई : मुंंबई शहर आणि आसपासच्या परिसरात रविवारीसुद्धा पावसाचा जोर कायम होता. त्यातच भरतीच्या वेळी मुंबईलगतच्या समुद्रात दुपारी ४.८३ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. मात्र, त्या लाटांबरोबर समुद्रातील मानवनिर्मित कचराही चौपाट्यांवर येऊन पडत होता.यामुळे मरिन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा इत्यादी चौपाट्यांवर कचऱ्याचा ढीग साचत होता. या वेळी समुद्रकिनाऱ्यांवरून महापालिकेने सुमारे २३९ मेट्रिक टन कचरा गोळा केला. हा कचरा जेसीबी, डम्पर आणि मिनी कॉम्पक्टरच्या साहाय्याने महापालिका कर्मचाºयांनी उचलला.पावासाची धुवाधार बॅटिंगसुरू असतानाच समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेला सर्व कचरा किनाºयावर आल्याने चौपाट्यांवर कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले होते. महापालिका कर्मचाºयांनी सकाळपासूनच भरपावसात राबून संपूर्ण कचरा जमा केला. दरम्यान, रविवारची सुट्टी असल्याने पावसाची मज्जा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मात्र चौपाट्यांवर आलेल्या कचºयामुळे निराशा झाली. तसेच चौपाट्यांवर कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. समुद्रकिनाºयावरील कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे २३० हून अधिक कर्मचारी कार्यरत होते.चौपाट्यांवर जमा करण्यात आलेला कचरा (मेट्रीक टन)मरिन लाइन्स 7गिरगाव 12दादर-माहिम 30वर्सोवा-जुहू 178गोराई 12

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेट