Join us

शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 18:01 IST

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 151 तालुक्यात सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला.

मुंबई- दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 151 तालुक्यात सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या संबंधीचे अन्नधान्याचे नियतन राज्य सरकारला उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे या दुष्काळग्रस्त 151 तालुक्यांतील सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांना अन्नसुरक्षा योजनेचे लाभ प्राप्त होणार आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये या योजनेचे लाभ आधीपासूनच दिले जात आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस