Join us

अरबी समुद्रात मृतावस्थेत सापडला दुर्मिळ सनफिश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 22:23 IST

अरबी समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ््यात दुर्मिळ प्रजातीचा मृत सनफिश मिळाल्याची माहिती सोमवारी उघडकीस आली आहे.

मुंबई  - अरबी समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ््यात दुर्मिळ प्रजातीचा मृत सनफिश मिळाल्याची माहिती सोमवारी उघडकीस आली आहे. सदर बोट मुरूड भागात असताना हा दुर्मिळ मासा जाळ््यात आल्याची माहिती पर्सेसीन मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी लोकमतशी बोलताना दिली.

गणेश नाखवा म्हणाले की, यासंदर्भात संबंधित मच्छीमाराशी बोलणे झाले आहे. ससून डॉकमध्ये बोट मासे उतरवण्यासाठी येताच संबंधित मासा केंद्रीय समुद्री मस्त्य अनुसंधान संस्थानला (सीएमएफआरआय) कळवली जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार मुरूड कोस्टपासून ५० किलोमीटर आत आणि ६० मीटर खोल समुद्रात मासेमारी करताना हा मासा जाळ््यात सापडला. सीएमएफआरआयला अधिक संशोधन करण्यासाठी हा मासा ताब्यात दिला जाईल. स्थलांतरीत माशांच्या प्रजातीपैकी एक असलेला हा सनफिश गेल्या दोन ते तीन वर्षांत मुंबईच्या मच्छीमारांना दुसºयांदा दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या