Join us  

ताडोबात दुर्मिळ ‘काळा बिबट्या’चे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 3:06 AM

कॅमेऱ्यात छबी बंदिस्त; प्रामुख्याने दक्षिणेकडची दाट जंगले, आसाम आणि नेपाळमध्ये आढळतो

नम्रता फडणीस 

पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी अभयारण्यात अत्यंत दुर्मिळ अशा ‘काळा बिबट्या’चे दर्शन वन्यजीव छायाचित्रकारांना घडले आहे. ‘काळा बिबट्या’ ही बिबट्याची वेगळी प्रजाती नसली, तरीही भारतात काळा बिबट्या हे प्रामुख्याने दक्षिणेकडची दाट जंगले, आसाम आणि नेपाळमध्ये आढळतो. गेल्या वर्षी ताडोबामध्येच एक काळा बिबट्या आढळला होता. मात्र ती मादी होती आणि दोन दिवसांपूर्वी दिसलेला नर बिबट्या आहे. यावरून इथे काळा बिबट्याची जोडी असू शकते, असा दावा छायाचित्रकारांनी केला आहे.

नागपूर वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताडोबामध्ये काळा बिबट्यांची जोडी नव्हे, तर केवळ एकच काळा बिबट्या असण्याला दुजोरा दिला आहे. बिबट्या हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळतो. पिवळ्या त्वचेवर काळे ठिपके असलेला बिबट्या, क्लाऊडेड, बर्फाच्छदित भागात राहणारा बिबट्या आणि काळा बिबट्या अशा प्रकारचे बिबटे प्रामुख्याने दिसतात. महाराष्ट्रात पिवळ्या रंगाच्या बिबट्यांंची संख्या अधिक असली तरी काळा बिबट्याची नोंद नाही. मात्र, ताडोबा अभयारण्यात वन्यजीव छायाचित्रकार सुमित खरे यांच्या कॅमेºयात त्याची छबी बंदिस्त झाली आहे. हा अनुभव खरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.

खरे म्हणाले, अभयारण्यातील पांढरपवनी भागात ‘माया’ वाघिणीचे कार्यक्षेत्र आहे. तिथून एक अलार्म कॉल झाला. आमच्या काही गाड्या तिथेच कडेला थांबल्या. कुणाच्या तरी पायाची हालचाल झाली असे वाटले. दहा मिनिटात लंगूर, हरणांचे कॉल्स यायला लागले. ‘माया’ बाहेर येईल असे वाटले. त्यानंतर कॉल्स येणे बंद झाले. आमच्याबरोबरच्या काही गाड्या निघून गेल्या. दहा मिनिटं वाट बघू म्हणून आम्ही गाडीतच होतो. एका बांबूच्या गवतात सळसळ ऐकू आली. पाच मिनिटात कॅमेºयात शेपटी दिसली. पाच ते दहा मिनिटानंतर काळ््या रंगाचा बिबट्या बाहेर आला. वाघीण प्रचंड हुकूमत गाजवणारी असल्याने तो तिच्या कार्यक्षेत्रातून जाताना थोडा दबकत जात होता. काही मिनिटांतच तो रस्ता ओलांडून क्षणात गायबही झाला.वनविभागाचा दुजोरानागपूरचे विभागीय वन अधिकारी शतालिक भागवत यांनी ताडोबा अभयारण्यात काळ््या बिबट्या असण्याला दुजोरा दिला आहे. येथे एक छोटा काळा बिबट्या दिसला होता. तोच आता मोठा झाला असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :बिबट्याताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प