लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:27+5:302021-01-08T04:12:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रकृती ठीक राहत नसल्याने व्यायामशाळेत जाण्याच्या निर्णय घेणाऱ्या महिलेला तो चांगलाच महागात पडला. ...

Rape of a woman showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रकृती ठीक राहत नसल्याने व्यायामशाळेत जाण्याच्या निर्णय घेणाऱ्या महिलेला तो चांगलाच महागात पडला. प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या इरफान अल्ताफ शेख (३०) याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा पती हा कामाच्या निमित्ताने परदेशात राहतो. तिला चार वर्षांची मुलगी आहे. प्रकृती ठीक राहत नसल्याने, तिची व्यायामशाळेत जाण्याचे ठरविले. तिथे तिची ओळख शेखसोबत झाली. शेख याने तिच्याशी मैत्री वाढविली. मार्च, २०२० मध्ये ती त्याच्या घरी राहण्यास आली. मे महिन्यापर्यंत ती तिथेच राहत होती आणि मुलीला तिने सासरी सोडले होते. शेख याने त्या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला, तसेच तिचे दागिने व पैसाही लुबाडले असे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार, दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: Rape of a woman showing the lure of marriage