लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:49+5:302021-07-14T04:07:49+5:30

मुंबई : फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातच लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ...

Rape of a woman on the pretext of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

मुंबई : फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातच लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून न्यूटन जोश्वा नावाच्या व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवई परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेची २०१२ मध्ये फेसबुकवरून न्यूटन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. पुढे त्याने भेटण्याचा आग्रह धरला. न्यूटनने पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे सांगून, विवाहाची मागणी घातली. पुढे लग्नाच्या बोलणीसाठी पवई लेक येथे भेटण्यास बोलावले. ठरल्याप्रमाणे संबंधित महिला आईसोबत तेथे आल्याचे समजताच, न्यूटनने एकटे येण्यास सांगून मोबाईल बंद केला. पुढे त्याने पुन्हा कॉल करताच महिलेने कॉल घेणे बंद केले.

२०१३ मध्ये न्यूटन महिलेच्या घराकडे भेटण्यास आला. मात्र त्याने घरी येण्यास नकार दिला. तो लग्न करण्यास इच्छुक असल्यामुळे कुटुंबीयांनीही तिला त्याच्यासोबत भेटण्यास पाठविले. पुढे त्यांच्यात मैत्री झाली. न्यूटनला केरळला जायचे असल्यामुळे त्याने त्याच्या हॉटेलची देखभाल करण्याची जबाबदारी महिलेकडे दिली तसेच त्याच्या घरी राहण्यास सांगितले. न्यूटन लग्न करणार असल्यामुळे ती तेथे राहू लागली.

या काळात न्यूटनने नशेची गोळी खाण्यास देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. पुढे लग्नाबाबत विचारणा करताच, शिवीगाळ केल्यामुळे अशात महिलेने पवई पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर कारवाई होत नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

Web Title: Rape of a woman on the pretext of marriage