पैशांसाठी गेलेल्या तरुणीवर सावकाराने केला बलात्कार

By Admin | Updated: November 11, 2014 01:46 IST2014-11-11T01:46:33+5:302014-11-11T01:46:33+5:30

घराच्या दुरु स्तीकरिता उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरु णीवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना शनिवारी दिंडोशी येथे घडली आहे.

Rape victim looted the woman who went for money | पैशांसाठी गेलेल्या तरुणीवर सावकाराने केला बलात्कार

पैशांसाठी गेलेल्या तरुणीवर सावकाराने केला बलात्कार

मुंबई : घराच्या दुरु स्तीकरिता उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरु णीवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना शनिवारी दिंडोशी येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी हा फरार आहे.
पीडित तरूणीला आपल्या घराच्या दुरु स्तीसाठी 5क् हजार 
रुपयांची आवश्यकता होती. त्याकरिता तिने एका मित्रकडे विचारणा केली होती. तेव्हा तिच्या मित्रने गोरेगाव येथील दिंडोशी परिसरात एक सावकार मित्र उसनवारीवर पैसे देत असल्याचे सांगितले. तू त्याच्या घरी जाऊन पैसे घे, असे सांगितले. शनिवारी दुपारी पैसे देतो, घरी ये, असे त्या सावकाराने तिला सांगितले. तेव्हा पीडित तरु णी त्याच्या घरी गेली. सावकाराने गुंगीचे औषध टाकलेले शीतपेय तिला दिले. त्यानंतर ती बेशुद्ध होताच सावकाराने तिच्यावर बलात्कार करून तेथून पळ काढला. शुद्धीवर आल्यावर तरु णीने पोलिसात तक्रार दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Rape victim looted the woman who went for money