पुतणीवर बलात्कार करणारा अटकेत

By Admin | Updated: April 1, 2016 02:44 IST2016-04-01T02:44:12+5:302016-04-01T02:44:12+5:30

गेल्या चार वर्षांपासून काकाकडून १५ वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना कुलाबा येथे घडली. मुकेश खारवा (३२) असे नराधम काकाचे नाव असून कुलाबा

Rape victim detained | पुतणीवर बलात्कार करणारा अटकेत

पुतणीवर बलात्कार करणारा अटकेत

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून काकाकडून १५ वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना कुलाबा येथे घडली. मुकेश खारवा (३२) असे नराधम काकाचे नाव असून कुलाबा पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली आहे.
कुलाबा परिसरात तक्रारदार १५ वर्षीय तरुणी राहते. वडिलांच्या निधनानंतर आई आणि एक लहान भाऊ असे तिचे कुटुंब. त्यामुळे आई घरकामासाठी बाहेर गेल्यानंतर ती घरात एकटीच राहत होती. भेटण्याच्या बहाण्याने घरात येत असलेल्या खारवाची तिच्यावर वाईट नजर पडली. जीवे ठार मारण्याची धमकी देत गेल्या चार वर्षांपासून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. काकाच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने बुधवारी कुलाबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २४ तासांत पोलिसांनी खारवा याला अटक केली.

Web Title: Rape victim detained