शाळेतील मैत्रीचा फायदा घेत विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:41 AM2019-09-18T01:41:40+5:302019-09-18T01:41:44+5:30

शाळेतल्या जुन्या मैत्रीचा गैरफायदा घेत, एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घडना शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे.

Rape raped by taking advantage of school friendship | शाळेतील मैत्रीचा फायदा घेत विवाहितेवर बलात्कार

शाळेतील मैत्रीचा फायदा घेत विवाहितेवर बलात्कार

Next

मुंबई : शाळेतल्या जुन्या मैत्रीचा गैरफायदा घेत, एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घडना शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सतीश विश्वंभर वैद्य (३५) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा पीडितेच्या शाळेतील मित्र आहे. तोही शिवाजीनगर परिसरात राहतो. २०१७ पासून त्याने पीडित महिलेशी संपर्क वाढविला. नोव्हेंबर, २०१७ मध्ये तो तिला रबाळे येथील सक्सेस हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. हॉटेलच्या एका खोलीत नेत त्याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, याबाबत महिलेच्या पतीला सांगण्याची धमकी देत, तिच्यावर बदलापूर, महापे अशा ठिकाणी नेऊन बलात्कार केला, तसेच तिला शिवीगाळ करून, मारहाणदेखील केली. त्याच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Rape raped by taking advantage of school friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.