एमडीचे सेवन केलेल्या तरुणीवर बलात्कार
By Admin | Updated: July 16, 2015 04:10 IST2015-07-16T04:10:41+5:302015-07-16T04:10:41+5:30
मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायात मुंबई पोलिसांचा सहभाग उघड झाल्याने आधीच मोठी चर्चा सुरु आहे. त्यात एमडीच्या आहारी गेलेल्या २० वर्षीय

एमडीचे सेवन केलेल्या तरुणीवर बलात्कार
मनीषा म्हात्रे, मुंबई
मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायात मुंबई पोलिसांचा सहभाग उघड झाल्याने आधीच मोठी चर्चा सुरु आहे. त्यात एमडीच्या आहारी गेलेल्या २० वर्षीय उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीवर भररस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये उघडकीस आली. मालाड हायवेवर ११ जुलै रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याच्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
कुरार परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला गेल्या काही महिन्यांपासून एमडीचे व्यसन जडले होते. ११ जुलैच्या सायंकाळी ती कामावरुन घरी निघाली. निघताना तस्काराकडून एमडी विकत घेऊन त्याचे सेवन केले. याच नशेमध्ये ती मालाड हायवेवरुन चालत निघाली. नशेत चालत असलेल्या या तरुणीला रात्री ८च्या सुमारास एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केला.