रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अनेकदा बलात्कार

By Admin | Updated: March 6, 2015 23:56 IST2015-03-06T23:56:27+5:302015-03-06T23:56:27+5:30

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा बहाणा करून पेण-पनवेल मार्गावरील एका लॉजवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना रिस गावात उघडीस आली आहे.

Rape is often done on marriage by threatening revolver | रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अनेकदा बलात्कार

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अनेकदा बलात्कार

अलिबाग : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा बहाणा करून पेण-पनवेल मार्गावरील एका लॉजवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना रिस गावात उघडीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रसायनी पोलिसांत खालापूरमधील विनायक थोरवे यांच्याविरुद्ध तक्रार केली असून थोरवेने रिसमधील आपल्या घरी व मोहोपाडा येथील एचओसी कंपनीबाहेरील परिसरातही अनेकदा बलात्कार केल्याचे महिलेने आरोप केला आहे. दरम्यान, फरार थोरवेचा रसायनी पोलीस शोध घेत आहेत.
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पती व मुलांना ठार मारण्याच्या धमक्या देत २३ जून २०१४ ते डिसेंबर २०१५ अशा सहा महिन्यांच्या कालावधीत थोरवेने बलात्कार केला. दरम्यान, विनायक थोरवेकडे असलेले रिव्हॉल्व्हर रीतसर परवाना घेऊन त्याने घेतलेले असून, त्याची पत्नी ग्रामपंचायत सदस्या असल्याची माहिती रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. शिंदे यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

अश्लील फोटो ग्रामपंचायतीत लावण्याची धमकी
च्दरम्यान मंगळवारी इसांबा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला पीडित महिला गेली असता, ‘तू मीटिंगसाठी का आलीस’ असे विचारून ‘तुझे काढलेले अश्लील फोटो ग्रामपंचायतीमध्ये लावतो’ अशी धमकी विनायक थोरवे याने दिली. या धमकीने घाबरून जाऊन पीडित महिलेने झोपेच्या गोळ््या घेतल्या. या प्रकाराने पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातून बरे झाल्यावर पीडित महिलेने साऱ्या त्रासाची कल्पना आपल्या पतीला दिली. त्यावर शांतपणे विचार करून त्यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Rape is often done on marriage by threatening revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.