अल्पवयीन मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार
By Admin | Updated: June 20, 2016 03:55 IST2016-06-20T03:55:08+5:302016-06-20T03:55:08+5:30
रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षामध्ये नेऊन ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना भांडुपमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात बलात्कार

अल्पवयीन मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार
मुंबई : रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षामध्ये नेऊन ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना भांडुपमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू आहे.
भांडुप खिंडीपाडा परिसरात ही मुलगी परिसरात खेळत असताना विकृत तरुणाची नजर तिच्यावर पडली. आई बोलावत असल्याचे सांगून त्याने तिला पार्क केलेल्या रिक्षांकडे नेले. त्यापैकी एका रिक्षामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरी गेल्यावर मुलीच्या हालचालींकडे आईचे लक्ष गेले. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने झालेला प्रकार आईला सांगितला. आईने भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. (प्रतिनिधी)