घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: March 15, 2015 00:13 IST2015-03-15T00:13:23+5:302015-03-15T00:13:23+5:30

तुर्भे येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी घर सोडून कल्याण येथे गेली असता तिला फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.

Rape with a minor girl fleeing home | घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी मुंबई : तुर्भे येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी घर सोडून कल्याण येथे गेली असता तिला फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.
तुर्भे येथे राहणारी १२ वर्षीय मुलगी घर सोडून कल्याण येथे गेली होती. यावेळी तिला कल्याण येथे भेटलेल्या तरुणाने फूस लावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला पुन्हा तुर्भे रेल्वे स्थानक येथे आणून सोडले होते. मात्र त्यानंतरही या अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. तुर्भे रेल्वे स्थानकात ती उभी असताना तेथे आलेल्या व्यक्तीने आसरा देण्याच्या बहाण्याने तिला कामोठे येथे नेले होते. तेथे मित्राच्या घरामध्ये या अल्पवयीन मुलीला ठेवून तो बाहेर गेला. यावेळी घरातील एकांताचा गैरफायदा घेत फारुख अन्सारी याने देखील या मुलीवर बलात्कार केला. सलग दोन दिवस हा अत्याचार झाल्यानंतर घरी आलेल्या या मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या पथकाने चौघांना अटक केली. त्यामध्ये फारुख याच्यासह त्याचा मित्र बादल गौतम याचा व इतर दोघांचा समावेश आहे, तर इतर एकाचा शोध सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले. अटक केलेल्या चौघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Rape with a minor girl fleeing home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.