अल्पवयीन मुलीवर बलात्कार कर्जतमध्ये दोघांना अटक
By Admin | Updated: April 12, 2015 02:35 IST2015-04-12T02:35:17+5:302015-04-12T02:35:17+5:30
कर्जमधील एका अल्पवयीन मुलीवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार कर्जतमध्ये दोघांना अटक
कर्जत : कर्जमधील एका अल्पवयीन मुलीवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रास ताब्यात घेतले आहे. त्याला शनिवारी अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतमधील अल्पवयीन मुलीने शुक्रवारी पाोलीस ठाण्यात येऊन ही तक्रार दाखल केली. शहरातील बुद्धनगरमधील सिद्धांत राहुल डाळिंबकर याने फेब्रुवारी २०१२ ते ३ एप्रिल २०१५ या दोन वर्षांच्या काळात पिस्तुलाचा व चॉपरचा धाक दाखवून जबदस्तीने आय -२० या गाडीत बसवून बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सिद्धांत राहुल डाळिंबकर (२४) व त्याचा मित्र पंकज प्रकाश मोरे (२२) याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीने सिद्धांत डाळिंबकर याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. तर मुलीच्या कुटुंबीयांवर सिद्धांतच्या वडिलांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.