ऐरोलीत विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न

By Admin | Updated: June 27, 2015 01:24 IST2015-06-27T01:24:48+5:302015-06-27T01:24:48+5:30

ऐरोली येथे घरात घुसून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. रात्री महिला घरात एकटी झोपलेली असताना

Rape of Marriage in Airliet Marriage | ऐरोलीत विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न

ऐरोलीत विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न

नवी मुंबई : ऐरोली येथे घरात घुसून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. रात्री महिला घरात एकटी झोपलेली असताना खिडकीतून आत घुसून तरुणाने हा प्रकार केला. यावेळी महिलेने विरोध केल्यामुळे तरुणाने तिला जबर मारहाणदेखील केली.
ऐरोली सेक्टर १ येथे राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. एक वर्षापासून पतीसोबत ती तिथे राहत आहे. २३ जून रोजी पती कामावर गेल्याने रात्री १०.३० वाजता ती घरात एकटीच झोपली होती. यावेळी कोणीतरी घरात घुसल्याचे महिलेला जाणवल्याने तिला जाग आली. त्या इसमाने बलात्काराचा प्रयत्न केल्याने महिलेने आरडाओरडा केला. तरुणाने तिला मारहाण करून उघड्या खिडकीतून बाहेर पळ काढला. घराची खिडकी उघडी असताना त्याच ठिकाणातून तो आत आला होता. या विवाहितेचा ओरडण्याचा आवाज ऐकताच शेजारच्यांनी तिच्याकडे चौकशी केली. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली. शेजाऱ्यांनी शोधाशोध केली असता एक तरुण संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला पकडून महिलेसमोर उभे केले असता तिने त्याला ओळखले. भिमा चव्हाण असे त्याचे नाव असून तो त्याच परिसरात राहतो. त्याने मोबाइल व पर्समधील रक्कमदेखील चोरल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. नागरिकांनी पकडल्यानंतरही तो महिलेला धमकावत होता. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Rape of Marriage in Airliet Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.