मालवणीत बलात्कार
By Admin | Updated: August 28, 2015 02:16 IST2015-08-28T02:16:53+5:302015-08-28T02:16:53+5:30
कायमस्वरूपी नोकरीचे अमिष दाखवत एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मालवणी येथे घडली आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या कामगार युनियन नेत्या

मालवणीत बलात्कार
मुंबई : कायमस्वरूपी नोकरीचे अमिष दाखवत एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मालवणी येथे घडली आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या कामगार युनियन नेत्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यकांत कोळी, याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोळी हा एका खाजगी कंपनीच्या कामगार युनियनचा नेता आहे. पीडित महिला एका खाजगी कंपनीत कंत्राटीतत्त्वार काम करत होती. त्यावेळी ती कोळीच्या संपर्कात आली. त्याने तिला कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
तेव्हा त्याने तिला गुंगीचे औषध देऊन मार्वे येथे एका लॉजवर नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना २०१३ मध्ये घडली. त्यानंतर तो वांरवार तिच्या बलात्कार करत होता. अखेर याने त्रस्त झालेल्या पीडित महिलेने शंभर नंबरवर याची तक्रार केली. त्यानुसार मालवणी पोलिसांकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली. त्याची दखल घेत पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला आहे. याची चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.