नोकरीच्या आमिषाने बलात्कार

By Admin | Updated: June 7, 2014 00:38 IST2014-06-07T00:38:01+5:302014-06-07T00:38:01+5:30

नोकरी मिळणार या आशेवर घरातून बाहेर पडलेल्या एका 19वर्षीय तरुणीचा तिच्याच मैत्रिणीने विश्वासघात केला.

Rape of job bait | नोकरीच्या आमिषाने बलात्कार

नोकरीच्या आमिषाने बलात्कार

>मैत्रिणीनेच केला घात : तीन रिक्षाचालकांसह मैत्रीणही गजाआड
मुंबई : नोकरी मिळणार या आशेवर घरातून बाहेर पडलेल्या एका 19वर्षीय तरुणीचा तिच्याच मैत्रिणीने विश्वासघात केला. या मैत्रिणीने तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ओळखीतल्या तरुणांच्या हवाली केले. त्यापैकी एकाने या असाहाय्य तरुणीवर  बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या पूर्व उपनगरात ही घटना घडली.
या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी घातकी मैत्रीण, प्रत्यक्ष बलात्कार करणा:या तरुणासह या गुन्ह्यात सहकार्य करणा:या त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौघांना बलात्कार, अपहरणाच्या गुन्ह्यान्वये गजाआड करण्यात आले आहे. न्यायालयाने या चौघांना 1क् जूनर्पयत पोलीस कोठडीत धाडले आहे.
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने बारावी पास झाल्यानंतर ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाला आधार देण्याच्या इराद्याने ती नोकरीच्या शोधात होती. मला नोकरी बघा ना, अशी विनंती ती ओळखीतल्यांना करत होती. त्याप्रमाणो तिने नसीम बानू खान (23) हिलाही कुठे नोकरी असेल तर सांग, असे आवाहन केले होते. नसीम आणि फिर्यादी तरुणी एकाच परिसरात राहात असल्याने एकमेकींना ओळखत होत्या. 
पुढे नसीमने या तरुणीला कुल्र्यातील एका पार्लरमध्ये नोकरी करणार का, अशी विचारणा केली होती. तरुणी तयार झाली. त्यानुसार त्या पार्लरमध्ये घेऊन जाते, असे सांगून 4 जूनला सकाळी दोघी कुल्र्यात आल्या. दिवसभर नसीमने बहाण्यांवर बहाणो करून या तरुणीला कुल्र्यात फिरवले. संध्याकाळी 6च्या सुमारास चेंबूर परिसरात राहणारे दीपक पाटील (34) आणि फारुख शेख (29) हे दोघे जण भेटले. हे दोघे नसीमच्या ओळखीतले होते. तेथून या तिघांनी तरुणीला बहाणा करून अमीर खान (2क्) याच्या घरी नेले. तोर्पयत रात्री 9 वाजले होते. आमीरच्या घरी पोहोचताच नसीम मोबाइल बिघडल्याचे कारण सांगून बाहेर पडली ती पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर दीपक आणि फारूक यांनीही तेथून काढता पाय घेतला. ही तरुणी नसीमची वाट पाहत असतानाच आमीरने तिच्यावर जबरदस्ती केली. ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. पहाटे 5च्या सुमारास तिने आमीरच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत आपले घर गाठले. 
दरम्यान, मुलगी घरी परतली नाही म्हणून काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणो गाठून हरविल्याची तक्रार दिली. पोलीस तपास सुरू करणार इतक्यात ही तरुणी स्वत:हूनच घरी आल्याने कुटुंबीयांचा जीव भांडय़ात पडला. मात्र गुदरलेला प्रसंग मुलीने सांगताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 
कुटुंबीयांनी पुन्हा पोलीस ठाणो गाठून घडला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी पहिल्याच झटक्यात नसीमला ताब्यात घेतले. तिच्याकडील चौकशीत अन्य तिघांचा ठावठिकाणा मिळाला. पोलिसांनी जराही उसंत न घेता तिघांनाही लगोलग अटक केली. तिघेही रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
नसीम आणि आमीर यांनी कट रचून या तरूणीला घरी आणले आणि तिच्यावर अत्याचार केले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने चौघांकडेही स्वतंत्रपणो चौकशी सुरू असल्याचे समजते. याशिवाय या चौघांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे का, याचीही चाचपणी पोलिसांनी सुरू केली आहे. 

Web Title: Rape of job bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.