घरकाम देतो सांगत मोलकरणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:07 IST2021-09-23T04:07:07+5:302021-09-23T04:07:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोलकरणीवर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार मंगळवारी वांद्रे परिसरात घडला. याप्रकरणी ...

Rape of a housemaid | घरकाम देतो सांगत मोलकरणीवर बलात्कार

घरकाम देतो सांगत मोलकरणीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोलकरणीवर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार मंगळवारी वांद्रे परिसरात घडला. याप्रकरणी घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

राजू भय्या (३५) आणि यास्मिन (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पीडित अठ्ठावीस वर्षीय तरुणी ही बोईसरची राहणारी आहे. ती कामाच्या शोधात खार परिसरात आली होती. तेव्हा तिची भेट यास्मिन सोबत झाली. पीडितेने तिला कामाबाबत विचारणा केली. तेव्हा यास्मिनने राजूच्या वांद्रे येथील घरी तिला घरकामासाठी जाण्यास सांगितले. मात्र, तरुणी राजूच्या घरी पोहोचल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याप्रकरणी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मात्र, सदर तरुणीने याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Rape of a housemaid