गोराईच्या गेस्ट हाउसमध्ये बलात्कार

By Admin | Updated: June 29, 2017 02:36 IST2017-06-29T02:36:40+5:302017-06-29T02:36:40+5:30

गोराई परिसरातील गेस्ट हाउसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने बलात्कार केल्याचा गुन्हा एमएचबी

Rape in the guest house of Goraiya | गोराईच्या गेस्ट हाउसमध्ये बलात्कार

गोराईच्या गेस्ट हाउसमध्ये बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोराई परिसरातील गेस्ट हाउसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने बलात्कार केल्याचा गुन्हा एमएचबी पोलिसांनी दाखल केल्याने गोराई - मनोरी भागातील गेस्ट हाउसमधून अनैतिक कृत्यांना मिळणाऱ्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एमएचबी परिसरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर गोराईतील गेस्ट हाउसमध्ये बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणी गेस्ट हाउसचे चालक आणि मालक यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी मोहन कृष्णन यांनी केली आहे. गोराईप्रमाणेच मनोरी परिसरातही अग्निसुरक्षेसंबंधात केवळ सात गेस्ट हाउस, रिसॉर्टकडून योग्य ती कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यात आली आहेत.

Web Title: Rape in the guest house of Goraiya