Rape in Chalisgaon on Mumbai's women | मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावमध्ये बलात्कार
मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावमध्ये बलात्कार

चाळीसगाव : मोबाईलवर चुकून आलेल्या फोनने मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. राँग नंबर लागलेल्या मोबाईल क्रमांकाच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला येथे लॉजवर नेऊन तिच्यावर पाच दिवस अत्याचार केले.


पीडित महिलेने पतीला हा प्रकार सांगितल्यावर चुनाभट्टी पोलीस स्टेशनचा हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोघांपैकी एकाला धुळे, तर दुसºयाला चाळीसगाव येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी आकाश प्रल्हाद रोकडे (रा. धुळे) याने काही दिवसांपूर्वी भावाला मोबाईलवरून फोन केला. हा फोन चुकून मुंबईतील चेंबूर भागातील महिलेला लागला. राँग नंबर लागला, असे सांगत संभाषण संपले. त्यानंतर मात्र ती पीडित महिला रोकडे याच्याशी संपर्कात आली. दोघांमध्ये मोबाईलवरून बोलणे वाढले. माझे पतीशी जमत नाही. तो सतत मारहाण करतो, जीवन जगावेसे वाटत नाही. जीवाचे बरेवाईट करून घेईल, असे पीडित महिलेने रोकडे याच्याशी बोलण्याच्या नादात सांगून टाकले. त्यावर रोकडे याने असे करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत महिलेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर दोघांमध्ये वेळोवेळी मोबाइलवरून संभाषण सुरू होते.


रोकडे याने पीडित महिलेला चाळीसगावी बोलावले. रोकडे व त्याचा मित्र करण राजाराम राखपसरे (चाळीसगाव) यांनी पीडित महिलेला चाळीसगाव बसस्थानकासमोरील लॉजमध्ये नेऊन १९ ते २३ जून दरम्यान तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने तेथून सुटका करून घेतली.


Web Title: Rape in Chalisgaon on Mumbai's women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.