दिंडोशीमध्ये चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

By Admin | Updated: December 26, 2015 02:01 IST2015-12-26T02:01:01+5:302015-12-26T02:01:01+5:30

पाचवर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या १५वर्षीय मुलाला दिंडोशी पोलिसांनी बुधवारी अटक केली. यातील पीडित मुलगी ही या मुलाच्या शेजारी राहणारी आहे. तिच्यावर

Rape attempt on chimudiri in Dindoshi | दिंडोशीमध्ये चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

दिंडोशीमध्ये चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

मुंबई : पाचवर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या १५वर्षीय मुलाला दिंडोशी पोलिसांनी बुधवारी अटक केली. यातील पीडित मुलगी ही या मुलाच्या शेजारी राहणारी आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दिंडोशी परिसरात ही पीडित मुलगी राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ती तिच्या घराशेजारी खेळत होती. तेव्हा या मुलाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत स्वत:च्या घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मुलगी कशीबशी या ठिकाणाहून पसार झाली आणि तिने घडला प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने तडक पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Rape attempt on chimudiri in Dindoshi