बलात्काऱ्यास अटक
By Admin | Updated: May 19, 2015 23:14 IST2015-05-19T23:14:20+5:302015-05-19T23:14:20+5:30
गेली दहा महिने एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश मेहरोल (२३) याला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे.

बलात्काऱ्यास अटक
ठाणे: लैंगिक अत्याचार अत्याचाराचे फोटो मित्रांमध्ये वितरीत करण्याची धमकी देऊन गेली दहा महिने एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश मेहरोल (२३) याला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोखरण रोड क्र. २, वसंत विहार येथे राहणाऱ्या या १७ वर्षीय तरुणीच्या घरी तिचे आई वडील नसतांना रितेश आॅगस्ट २०१४ मध्ये गप्पा मारण्याच्या बहाण्याने शिरला. तिला दमदाटी करुन तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. त्याच काळात तिचे फोटोही काढले. मी सांगतो तशी वागली नाहीस तर हेच फोटो मित्रांनाही दाखवेन, अशी धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर दहा महिने अत्याचार केले.
या अत्याचाराला कंटाळून तिने आपल्या आई वडीलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी १७ मे रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलीसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, बलात्कार, आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अवघ्या काही तासातच अटक केली. त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
(प्रतिनिधी)