नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
By Admin | Updated: May 28, 2015 00:52 IST2015-05-28T00:52:39+5:302015-05-28T00:52:39+5:30
खासगी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या तरूणीने केलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
मुंबई : खासगी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या तरूणीने केलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. लेफ्टनंट एम. किरण असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
कुलाबा पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार तरूणी व आरोपी किरण यांची ओळख गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात फेसबूकच्या माध्यमातून झाली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे आरोपी ले. किरणने तरूणीला विशाखापटटणम येथे भेटण्यासाठी बोलावले. त्या भेटीत त्याने तरूणीला लग्नाची मागणी घातली. तेथील
एका हॉटेलमध्ये दोघांमध्ये शरिरसंबंध आले.
मात्र काही दिवसांनी आरोपी ले. किरणने लग्नास नकार दिला. तसेच जबरदस्ती करत तरूणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. एवढयावरच न थांबता आरोपीने दोन महिन्यांपुर्वी ब्लॅकमेल करून तरूणीवर बलात्कार केला.
चौकशीत मुंबईतील अत्याचार ज्या हॉटेलमध्ये घडला ती कफपरेड पोलिसांची हदद असल्याची माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली. त्यामुळे कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी कफपरेड पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)