राव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आवश्यक : ‘नानावटी’चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 03:22 IST2020-08-22T03:22:11+5:302020-08-22T03:22:17+5:30

राव यांच्या प्रकृतीत सुधारणा नसून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे नानावटी रुग्णालयाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Rao's health needs to be monitored: Nanavati report | राव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आवश्यक : ‘नानावटी’चा अहवाल

राव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आवश्यक : ‘नानावटी’चा अहवाल

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी वरवरा राव यांच्या प्रकृतीत सुधारणा नसून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे नानावटी रुग्णालयाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
राव यांच्यावर वेगवेगळ्या आजारांवर १६ जुलैपासून नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने नानावटी रुग्णालयाला राव यांच्या प्रकृतीची माहिती आणि त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले होते.
राव यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात येत नसल्याची तक्रार राव यांच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने नानावटी रुग्णालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Rao's health needs to be monitored: Nanavati report