मनसेच्या कल्याणमधील पदाधिका-यांवर रेल्वेनेही केले गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 19:27 IST2017-10-30T19:25:38+5:302017-10-30T19:27:45+5:30
कल्याणमधील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर मनसैनिकांनी २१ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जमावाने स्थानक परिसरात मनसैनिक आले होते,त्यामुळे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने सुमारे ३०-४० मनसैनिकांवर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले

मनसेच्या कल्याणमधील पदाधिका-यांवर रेल्वेनेही केले गुन्हे दाखल
ठळक मुद्देकौस्तुभ देसाई, काका मांडले, उल्हास भोईर यांना अटक सुटका
डोंबिवली: कल्याणमधील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर मनसैनिकांनी २१ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जमावाने स्थानक परिसरात मनसैनिक आले होते,त्यामुळे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने सुमारे ३०-४० मनसैनिकांवर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
त्यापैकी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, काका मांडले, उल्हास भोईर यांच्यासह ७ जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यानूसार न्यायालयात हजर करुन जामिनावर मुक्तता केल्याची माहिती कल्याण लोहमार्र्ग पोलिस अधिकारी माणिक साठे यांनी दिली. मंगळवारीही आणखी काही मनसैनिकांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------