Join us  

पीएमसी बँक घोटाळा : भाजपाचे माजी आमदार तारा सिंग यांचे पुत्र रणजीत सिंग यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 8:25 PM

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी भाजपाचे माजी आमदार तारासिहं यांचे पुत्र व माजी अध्यक्ष रमन सिहं याला आज आर्थिक गुन्हा शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

मुंबई: पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी भाजपाचे माजी आमदार तारासिहं यांचे पुत्र व माजी अध्यक्ष रमन सिहं याला आज आर्थिक गुन्हा शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

याआधी देखील दोन लेखी परिक्षकांना अटक करण्यात आली होती. जयेश संघानी आणि केतन लाकड़वाला या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची दोघाही आरोपींना पूर्ण कल्पना होती. दोघांच्याही चौकशीत समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आली होती.

दरम्यान पीएमसी बँकेच्या दिवाळीखोरीचं प्रमुख कारण म्हणजे बँकेकडून चुकीच्या पद्धतीने 2500 कोटी रुपयांच्या कर्जाची वाटप करण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांना हे कर्ज देण्यात आले आहे. हाऊसिंग डेव्हलपमेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हेच बँकेच्या दिवाळखोरीचे प्रमुख कारण असल्याची माहिती आहे. नियमानुसार बँकांना थकित कर्जाची पूर्ण तरतूद त्या वर्षीच्या नफ्यातून करावी लागते. पीएमसी बँकेला 2018-19 या वर्षात 244.46 कोटी ढोबळ नफा झाला. परंतु त्यातून 315 कोटींची तरतूद अशक्य असल्याने बँकेने फक्त 99 कोटींची तरतूद केली. 2019 च्या ताळेबंदाप्रमाणे बँकेजवळ 11600 कोटींच्या ठेवी (9300 कोटी मुदत व 2300 कोटी बचत ठेवी) आहेत. बँकेने 8383 कोटींचे कर्जवाटप केले. बँकेचे भाग भांडवल 292.61 कोटी व राखीव निधी 933 कोटी आहे. यावर्षी बँकेने आपली 105 कोटीची थकित कर्जे सीएफएम असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकल्याची चर्चा आहे. ती खरी असेल तर हा व्यवहार अत्यंत संशयास्पद आहे.

टॅग्स :पीएमसी बँकअटकपोलिसधोकेबाजी