अलिबागमधील कनकेश्वरच्या जंगलात आढळला रानगवा

By Admin | Updated: October 4, 2014 22:46 IST2014-10-04T22:46:30+5:302014-10-04T22:46:30+5:30

येथून जवळच असलेल्या कनकेश्वरच्या जंगलाजवळच्या रांजणपाडा डोंगरावर रानगवा (इंडियन बायसन) असल्याची माहिती या परिसरातील आदिवासी बांधवांकडून गेल्या तीन-चार वर्षापासून कानावर येत होती.

Rangwa found in the forest of Kanakeshwar in Alibaug | अलिबागमधील कनकेश्वरच्या जंगलात आढळला रानगवा

अलिबागमधील कनकेश्वरच्या जंगलात आढळला रानगवा

>जयंत धुळप - अलिबाग
येथून जवळच असलेल्या कनकेश्वरच्या जंगलाजवळच्या रांजणपाडा डोंगरावर रानगवा (इंडियन बायसन) असल्याची माहिती या परिसरातील आदिवासी बांधवांकडून गेल्या तीन-चार वर्षापासून कानावर  येत होती. मात्र आता रांजणपाडा येथील निसर्गप्रेमी नीलेश पाटील यांनी थेट कनकेश्वरच्या जंगलात वावरणा:या रानगव्याचे छायाचित्रच काढल्याने हे वृत्त खरे असल्याची माहिती येथील निसर्गप्रेमी व वन्यप्राणी-पक्षी छायाचित्रकार प्रवीण कवळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
रानगव्याच्या नव्याने निष्पन्न झालेल्या या अस्तित्वाच्या अनुषंगाने बोलता कवळे म्हणाले, की अलिबाग परिसरातील जंगलात रानगव्यांचा वावर आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याही कानावर सातत्याने यायच्या, परंतु त्या मी खोडून टाकत असे. त्याला कारण म्हणजे अलिबाग परिसर हा रानगव्यांचा नैसर्गिक अधिवास नाही, तसेच यापूर्वी कधी इथे रानगवे आढळल्याची नोंद नाही. 
रानगव्यांचा अधिवास असलेलला परिसर म्हणजे पश्चिम घाटाचा दक्षिणकडील राधानगरी, चांदोली, आंबोली हा अलीबागपासून सुमारे 4क्क् कि.मी. दूर आहे. तेव्हा एवढय़ा दूरवर रानगवा येणो अविश्वसनीय वाटायचे. तेव्हा छायाचित्न पुरावा पण नसायचा, म्हणून प्रत्येकवेळी मला ती अफवा वाटायची़ पण रांजणपाडा येथील नीलेश पाटील व त्यांच्या मित्नांना कनकेश्वर जंगलालगतच्या रांजणपाडा डोंगरावर हा रानगवा आढळला. त्याचे छायचित्र देखील त्यांनी घेतले असल्याने आता मात्र विश्वास ठेवणो अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
रानगव्याच्या अभ्यासाची मागणी
रानगवे त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून एवढय़ा दूरवर कनकेश्वरच्या जंगलात कसे आले, त्यांची संख्या नेमकी किती, मूळ अधिवासापेक्षा कनकेश्वरच्या जंगलाचा अधिवास त्यांना वास्तव्याकरिता अधिक पोषक ठरतो आहे का, या अनुषंगाने वन विभागाच्या माध्यमातून सव्रेक्षणासह अभ्यास होणो गरजेचे असल्याची मागणी कवळे यांनी केली आहे.
 
वनविभागाचे सहकार्य
कोयना, महाबळेश्वर परिसरातील रानगवे मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यार्पयत पोहोचणो शक्य आहे. परंतु फणसाड अभयारण्यातूनच कनकेश्वरच्या जंगलात रानगवा आला असावा, हे आता लगेच सांगणो अवघड आहे, अशी माहिती पुणो वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

Web Title: Rangwa found in the forest of Kanakeshwar in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.