रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधेरीत रंगली मंगळागौर
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 3, 2023 17:57 IST2023-09-03T17:57:12+5:302023-09-03T17:57:55+5:30
अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे युनिवर्सल हॉल कानकिया वॉल स्ट्रीट च्या बाजूला हॉटेल वीरा रेसिडेन्सी चकाला येथे श्रावण महिन्यात सर्व शाखांतर्गत मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधेरीत रंगली मंगळागौर
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे युनिवर्सल हॉल कानकिया वॉल स्ट्रीट च्या बाजूला हॉटेल वीरा रेसिडेन्सी चकाला येथे श्रावण महिन्यात सर्व शाखांतर्गत मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भेट देऊन महिलांचे मनोबल वाढवले. त्यांच्या उपस्थितीत मंगळागौर रंगली.त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेत एकूण ३७ समूहांनी भाग घेतला.प्रथम विजेत्या समूहाला रु २१००० व चषक तसेच उपविजेत्या समुगाला रु ११००० व चषक व इतर समूहांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.महिलांनी मंगळ गौरीचे पूजन केले. तर नऊवारी भगव्या साड्या महिलांनी परिधान केल्या होत्या. उखाणे घेत,गाणी म्हणत आणि शिट्या वाजवत या मंगळागौरीला रंगत आली.
सदर स्पर्धेला सुनीता अनिल परब, उपनेते अमोल कीर्तिकर व सुप्रिया अमोल कीर्तिकर, महिला विभाग संघटिका राजुल पटेल, स्थानिक आमदार ऋतुजा लटके, विधानसभा संघटिका मंदाकिनी कदम, माजी नगरसेविका प्रियांका प्रमोद सावंत, युवती विभाग अधिकारी अक्षदा सावंत कदम, सर्व शाखाप्रमुख व महिला शाखा संघटिका, इतर पदाधिकारी, गटप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.