राणेंना सांत्वनाची गरज - उद्धव ठाकरेंचा टोला

By Admin | Updated: July 19, 2014 19:06 IST2014-07-19T13:32:58+5:302014-07-19T19:06:30+5:30

नारायण राणे यांना सांत्वनाची गरज असून, त्यांना कोठेतरी मन:शांती मिळावी अशी प्रार्थना ईश्वराकडे करतो',अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला

Raneena needs consolation - Uddhav Thackeray's totem | राणेंना सांत्वनाची गरज - उद्धव ठाकरेंचा टोला

राणेंना सांत्वनाची गरज - उद्धव ठाकरेंचा टोला

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - 'नारायण राणे यांना सांत्वनाची गरज असून, त्यांना कोठेतरी मन:शांती मिळावी अशी प्रार्थना ईश्वराकडे करतो', अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला. नारायण राणेंचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक यांनी उद्धव ठकारेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी हा टोमणा मारला.
कोकण दौ-यादरम्यान राणे यांनी शुक्रवारी हातखंबा येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. 'उद्धव यांनीच बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला', असा आरोप करत उद्धव यांनी  आपल्याविरोधात टीका करणे थांबवले नाही तर 'मातोश्री'च्या आतील गोष्टी बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर उद्धव यांनी राणेंना प्रत्युत्तर देताना हा टोला लगावला. 
दरम्यान नारायण राणेंचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राणे यांना मोठा धक्का बसला आहे. फाटक यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सात नगरसेवकांसह शिवसेनेत आज अधिकृत प्रवेश केला. 
शनिवारी सकाळी रविंद्र फाटक, त्यांच्या पत्नी, दीपक वेतकर, राजा गवारी, कांचन चिंदकर, मनप्रीत कौर, मीनल संख्ये यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने राणेंची पक्षात परत येण्याची किंवा भाजपात जाण्याची दारं आधीच बंद केलेली असताना फाटक यांच्या सेनाप्रवेशामुळे राणेंना मोठा हादरा बसला आहे. 

 

Web Title: Raneena needs consolation - Uddhav Thackeray's totem