Join us  

हेच नाराजीचे कारण... रामराजेंचा ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 6:55 AM

स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह ठेवून ‘कळेल ही आशा’ असे सूचक शब्द त्यांनी वापरले आहेत.   

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शिवसेनेतील आमदारांनी फुटून स्वतंत्र गट तयार केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही काही बड्या नेत्यांना गळाला लावले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत एक बैठकही झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, हाताला फारसे काही लागणार नाही, असा निष्कर्ष निघाल्यानंतर हे बंड थंड झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. मात्र, आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचे रामराजे यांनी सोशल माध्यमातून सांगितले. स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह ठेवून ‘कळेल ही आशा’ असे सूचक शब्द त्यांनी वापरले आहेत.   

शिवसेनेतील फुटीनंतर जिल्हा ताब्यातून जाणार आणि हातात काहीच उरणार नाही, याची जाणीव होऊ लागल्याच्या अस्वस्थतेतूनच काहींनी भाजपचा रस्ता धरल्याची चर्चा होती.

पक्षावर आपल्याच नातलगांची हवी मालकी... हेच नाराजीचे कारण 

काँग्रेस, राष्ट्रवादी असो अगर शिवसेना; या पक्षांवर काही ठराविक प्रमुखांची मालकी आहे. ती सोडण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आपल्या घरातीलच कोणीतरी पक्षाची धुरा पुढे सांभाळावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यातून काही निष्ठावंत नाराज होतात. त्यामुळे पक्षावरच ताबा मिळविण्याचा किंवा स्वतंत्र गट स्थापण्याचा प्रयत्न होतो आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही असाच विचार पुढे येऊ लागल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसरामराजे नाईक-निंबाळकर