मतदानानंतर उमेदवार रमले कुटुंबात
By Admin | Updated: October 17, 2014 01:23 IST2014-10-17T01:23:41+5:302014-10-17T01:23:41+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकत्र्यासह उमेदवारही पायाला भिंगरी लावून फिरत होते.

मतदानानंतर उमेदवार रमले कुटुंबात
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकत्र्यासह उमेदवारही पायाला भिंगरी लावून फिरत होते. आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून ते मतदानाच्या दिवसार्पयत दिवसाचे किमान 15 ते 18 तास ते व्यस्त होते. घरच्या सहवासालाही ते मुकले होत़े कुठे प्रतिष्ठेची लढत तर कुठे चुरशीची लढाई़ यामुळे उमेदवारांच्या घरच्या मंडळींशी भेट होणोही कठीण बनले होते. या अत्यंत व्यस्त दिनक्रमात 15 ऑक्टोबरची तारीख उजाडली़़़़ आणि तोही दिवस सुरुवातीला धिम्या गतीने आणि काहीशा तणावात संपला़ त्यानंतरचा आलेला आजचा गुरुवारचा दिवस उमेदवारांसाठी ख:या अर्थाने आरामदायी ठरला. त्यामुळे मतांसाठी घरोघरी फिरणा:या या उमेदवारांनी मतदानानंतर नेमके काय केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. मुंबईसह उपनगरांतील काही उमेदवारांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया..
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे मला गेले पंधरा दिवस आईला भेटता येत नव्हत़े त्यामुळे आज मी आईला भेटलो़ प्रचाराने कार्यकर्तेही दमले होत़े तरीही काही कार्यकर्ते भेटायला आले होत़े तसेच काही जण कामे घेऊन आले होत़े या सर्वाना भेटण्यातच दिवस गेला़
- सुरेश शेट्टी, काँग्रेस उमेदवार, अंधेरी पूर्व़
दिवसभर आराम केला़ काही कार्यकर्ते त्यांच्या विभागातील मतदानाचा आढावा देण्यासाठी आले होते तर काही जण खास भेटण्यासाठी आले होत़े दुपारी या सर्वाच्या भेटी घेतल्या़ उद्यापासून पुन्हा समाजकार्याला सुरुवात करणार आह़े
- कालिदास कोळंबकर,
काँग्रेस उमेदवार, वडाळा विधानसभा
मतमोजणीची तयारी केली़ कार्यकत्र्याना भेटलो़ दुपारी थोडा आराम करून सायंकाळी कुटुंबाला वेळ दिला़ प्रचारामुळे कुटुंबाला भेटता येत नव्हत़े त्यामुळे त्यांच्यासोबत रात्री जेवण करून गप्पा मारल्या़
- मिहिर कोटेचा, भाजप उमेदवार, वडाळा विधानसभा
गेला महिनाभर पक्षाची धुरा सांभाळत असताना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता आला नव्हता़ काल रात्री उशिरार्पयत मतदानाचा आढावा घेतल्यानंतर आज पूर्ण दिवस कुटुंबाला दिला़ थोडा आराम केला़ उद्या मुरूड जंजिरा या माङया गावी जाण्याचा विचार आह़े दोन दिवस तेथेच विश्रम करणार आह़े
- बाळा नांदगावकर, मनसे उमेदवार, शिवडी
विभागप्रमुख असल्याने पक्षाने आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे सकाळपासून आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार व पदाधिका:यांसोबत आढावा बैठका घेतल्या़ तसेच थोडा वेळ आरामदेखील केला़
- विनोद घोसाळकर,
शिवसेना उमेदवार, दहिसर विधानसभा
गेले पंधरावडाभर निवडणुकीच्या धावपळीमुळे फक्त दोन तास झोपलो होतो. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यावर आजचा दिवस दुपारी अडीच वाजेर्पयत झोपलो होतो. त्यानंतर कांदिवली पूर्वेच्या हनुमान नगर येथे दोन ठिकाणी भंडा:याचे आयोजन केले होते तेथे भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर गेले कित्येक दिवस कुटुंबाला वेळ दिला नव्हता म्हणून कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला आलो. कार्यकत्र्याना आज विश्रंती घेण्यास सांगितले होते, उद्यापासून परत कार्यकत्र्यासोबत कामाला लागणार आह़े
- अखिलेश चौबे, मनसे उमेदवार, कांदिवली पूर्व
मतदान झाल्यावर आजचा दिवस सकाळी उठल्यावर कार्यकत्र्यासोबत भेठीगाठीत घालवला. गेले कित्येक दिवस कुटुंबाला वेळ देता आला नाही त्यामुळे उरलेला वेळ कुटुंबासोबत घालवला. संध्याकाळी माझा एक जवळचा मित्र सर्वाना सोडून गेला, त्यामुळे त्याच्या घरी शोकसभेला गेलो होतो. उद्यापासून नव्या जोमाने कामाला सुरुवात होईल.
- सचिन सावंत, काँग्रेस उमेदवार, मागाठाणो
2क्14 ची निवडणूक अटीतटीची असल्यामुळे गेला महिनाभर झोपण्याकरितासुद्धा वेळ मिळत नव्हता. निवडणूक झाल्यावर रात्री उशिरा झोपलो व सकाळी उशिरार्पयत शांत झोपलो होतो. उठल्यावर आधी कुटुंब व मुलांसोबत थोडा वेळ घालवला. संध्याकाळी पदाधिका:यांशी भेटून मतदारसंघाचा एकूण आढावा घेतला. उद्यापासून पदाधिका:यांच्या भेठीगाठी व पुढच्या रणनीतीची तयारी करणार आहे.
- प्रवीण दरेकर, मनसे उमेदवार, मागाठाणो
सकाळी उशिरा उठलो़ घरी कार्यकर्ते आले होत़े त्यांच्याशी चर्चा केली़ दुपारी एका चर्चासत्रत सहभागी झालो़ त्यानंतर थोडावेळ आराम करून पुन्हा कार्यकत्र्याच्या भेटी घेतल्या़ रात्री एका विवाहाला गेलो़ उद्या घरीच आराम करून पुन्हा जनसेवेला सुरुवात करणार आह़े
- नवाब मलिक,
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार, अणुशक्ती नगर
मतदानाची प्रक्रिया संपली असली तर मतमोजणी शिल्लक आह़े गुरुवारी दिवसभरात निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी बंधनकारक केलेल्या आवश्यक कागदपत्रंची पूर्तता केली़ तसेच मतमोजणीसाठी कार्यकत्र्याची निवड केली़ शुक्रवारपासून नेहमीप्रमाणो समाजसेवेचे कार्य सुरू करणार आह़े
- मधुकर चव्हाण, काँग्रेस उमेदवार, भायखळा
नेहमीसारखाच आजचा दिवस गेला. सकाळी कार्यकत्यार्ंच्या भेटीगाठी घेतल्या. अकरा वाजता निवडणूक कार्यालयातील मीटिंगला हजेरी लावली. त्यानंतर सामान्य नागरिकांच्या भेटीगाठीतच चारच्या सुमारास कार्यालयातच जेवण उरकल़े थोडीशी विश्रंती घेतल्यावर सायंकाळी सहा वाजता मुलुंड योगी हिल येथील प्रतापसिंग उद्यानात भेट दिली. तेथे चिमुकल्यांसहित ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवला़
- सरदार तारासिंग, भाजपा उमेदवार, मुलुंड विधानसभा
आज घरी पूजा असल्याने सकाळी कुटुंबीय, गुरुद्वारामधील सहकारी, तसेच जवळचे स्नेही यांच्यासोबत वेळ घालवला. घरात पूजा व कीर्तन आटोपून दहा वाजता डॉक्टरांकडे हजेरी लावली. नेहमीप्रमाणो आजही कार्यालयात कार्यकत्र्यासोबतच जेवण उरकल़े उद्यापासून पुन्हा जनसेवेला सुरुवात करणार आह़े
- चरणसिंग सप्रा, काँग्रेस उमेदवार, मुलुंड
सकाळी सात वाजता खूप दिवसांनी फॅक्टरीत भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर आराम करून कुटुंबाला वेळ दिला़ तसेच कार्यकत्यार्ंच्या भेटी घेऊन त्यांचे आभार मानल़े
- अशोक पाटील, शिवसेना उमेदवार, भांडुप
सकाळी मुलुंड पूर्वेकडील देशमुख उद्यानात भेट दिली. उद्यानात आलेल्या प्रत्येकांशी संवाद साधला. त्यात आज खूप दिवसांनी मुलीला वेळ दिला. मुलीला स्वत: शाळेत सोडलं, पुन्हा शाळेतून आणायलाही गेलो. वाटेत तिच्याशी गप्पा मारल्या. दुपारी कुटुंबासोबतच जेवणाचा आनंद घेत सायंकाळी 6 पासून विभागातील मतदारांच्या भेटी घेत आभार मानले. उद्याचा दिवसही कुटुंबीयांसोबत
घालवण्याचा विचार आह़े
- सत्यवान दळवी,
मनसे उमेदवार, मुलुंड
आज दिवस मुलगी श्रीया (वय, 5 वर्षे ) हिला दिला. तब्बल पंधरा दिवसांनंतर श्रीयासोबत खेळलो़ प्रचारामुळे मला श्रीयाला भेटता येत नव्हत़े प्रचार संपवून घरी गेल्यावर ती झोपलेली असायची़ पण गुरुवारी संपूर्ण दिवस तिला दिल्याने खूप बरे वाटल़े त्यातूनही कार्यकत्र्याच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत नाश्ता केला.
- संजय बागडी,
काँग्रेस उमेदवार, वांद्रे पूर्व