राम मंदिर, बाबरी मशीदप्रकरणी आंदोलन

By Admin | Updated: May 6, 2017 04:06 IST2017-05-06T04:06:08+5:302017-05-06T04:06:08+5:30

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर तोडगा काढा, अशी मागणी राम मंदिर बाबरी मशीद कृती समितीने केली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे

The Ram Mandir, the movement for Babri Masjid | राम मंदिर, बाबरी मशीदप्रकरणी आंदोलन

राम मंदिर, बाबरी मशीदप्रकरणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त  जागेवर तोडगा काढा, अशी  मागणी राम मंदिर बाबरी मशीद कृती समितीने केली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे दादर टीटीत रविवारी, ७ मे रोजी दुपारी २ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर आणि बाबरी मशीदही उभारावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी पुढाकार घ्यावा आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ निकाल द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: The Ram Mandir, the movement for Babri Masjid