रामनगर पोलिसांच्या रडारवर आता बॅग लिफ्टर टोळी !

By Admin | Updated: April 3, 2015 22:44 IST2015-04-03T22:44:18+5:302015-04-03T22:44:18+5:30

सकाळच्या वेळेत बँकेसह अन्य व्यवहार करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पाळत ठेवत त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडील रकमेची बॅग

Ram Lampar police raidar now a bag lifter! | रामनगर पोलिसांच्या रडारवर आता बॅग लिफ्टर टोळी !

रामनगर पोलिसांच्या रडारवर आता बॅग लिफ्टर टोळी !

अनिकेत घमंडी, डोंबिवली
सकाळच्या वेळेत बँकेसह अन्य व्यवहार करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पाळत ठेवत त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडील रकमेची बॅग हिसकावून पळ काढणे, काहीतरी घाण पडल्याचे कारण सांगून नागरिकांना भूरळ घालून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरणे आदीं गुन्हे करणाऱ्या लिफ्टर गँगच्या मागे आता पोलीस हातधुवून लागले आहेत.
ही सर्व कृत्ये टोळीने होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार डिटेक्शन अधिकाऱ्यांनी सापळा रचत त्या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली असून अन्य साथीदार फरार असून त्यांचा पोलिस तपास घेत आहेत. त्या टोळीचा छडा लावायचाच असा चंग पोलिसांनी बांधला असून त्यासाठी भिवंडीसह मुंब्रा येथे जाण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहे.
या टोळीतील सय्यद चाँद बादशहा सय्यद बजरुद्दीन (४६) या चोराला पकडल्यानंतर त्याच्याकडून सर्व माहिती-शक्यता काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Ram Lampar police raidar now a bag lifter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.