कॉलेज आणि कॅम्पसमध्ये रक्षाबंधन उपेक्षितच

By Admin | Updated: August 5, 2014 00:28 IST2014-08-05T00:28:14+5:302014-08-05T00:28:14+5:30

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणून सगळीकडे साजरा केला जात असला तरी कॉलेजमधील तरुणाई तो कॉलेजात साजरा करीत नाही

Rakshabandhan in college and campus neglected | कॉलेज आणि कॅम्पसमध्ये रक्षाबंधन उपेक्षितच

कॉलेज आणि कॅम्पसमध्ये रक्षाबंधन उपेक्षितच

जान्हवी मोर्ये - ठाणो
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणून सगळीकडे साजरा केला जात असला तरी कॉलेजमधील तरुणाई तो कॉलेजात साजरा करीत नाही. इतर विविध डे साजरे होत असताना कॉलेजमध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. पण, भाऊ-बहिणीची जोडी हा कॉलेज जीवनात टिंगलीचा विषय असतो. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली आणि एखादा तरुणाने तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यास ती काय तुझी बहीण लागते का, असा सवाल उपस्थित करून मदत करणा:या तरुणाची खिल्ली उडवली जाते. एकाच कॉलेजात शिकणारे भाऊ-बहीण असतात. मात्र, त्यांचे फ्रेण्ड्स ग्रुप हे वेगवेगळे असतात. 
भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. आज महिला सुरक्षित नाहीत. यावर खुलेपणाने बोलतो. मात्र, कॉलेजमध्ये तरुण-तरुणींमध्ये बहीण-भावांची नाती साजरी करणो सोडा, सांगितलीसुद्घा जात नाही. ती व्यक्त करण्याबाबत बिलो डिगिAटी वाटते. पाश्चिमात्यांचे डे साजरे करण्याचे फॅड आपण स्वीकारले आहे. मात्र, आपले देशी सण साजरे करायला आपण विसरतो आहोत. काय आहेत त्यामागील कारणो? महाविद्यालयात रक्षाबंधन का साजरे होत नाही, याविषयी तरुणाई व प्राध्यापक मंडळींशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काही बोलक्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत..
 
रक्षाबंधनच्या दिवशी मुले कॉलेजात येत नाहीत. रक्षाबंधनातील नात्यांची निरागसता ही शालेय जीवनात जपली जाते. तरुणपणात निरागसता संपुष्टता येते. रक्षाबंधनाला सुटी नसते. तरीदेखील मुले-मुली येत नाहीत. आमच्या महाविद्यालयात प्रत्येक सणाचे महत्त्व सांगितले जाते. नवतेची जोड देऊन विद्याथ्र्याना सणांचे महत्त्व पटवून दिले जाते. अनेकदा विद्यार्थ्याना सण का व कशासाठी साजरे केले जातात, याविषयी माहिती नसते. ती दिली जाते. सध्या ‘हम दो हमारा एक’ या न्यायाने अनेक कुटुंबांत एक अपत्य असते. त्यामुळे अनेक मुलांना बहीण नसते. तर काही मुलींना भाऊ नसतो. ते व्यक्तिगत स्वरुपात कॉलेज कॅम्पसमध्ये रक्षाबंधन साजरे करतात.- प्रा. नितीन बव्रे, बिर्ला महाविद्यालय
 
मला भाऊ नाही व ज्यांना बहिण नाही. त्या मित्रंना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करते. यापूर्वी मी गल्र्स स्कूलमध्ये होते. गल्र्स स्कूलमध्ये असताना हा सण आला की मला खूप खिन्न वाटायचे. आत्ता कॉलेजमध्ये हा सण साजरा करता येतो. ज्यांना राखी बांधते ते भाऊ मदतीला धावून येतात.  रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जास्त उपयोगी ठरतात, असे मला वाटते.
- श्रुती गुप्ता 
 
आमच्या कॉलेजात रक्षाबंधन साजरे होत नाही. त्याविषयीचे कारण मला माहित नाही. कॉलेजचे वातावरण वेगळे असते. कॉलेज लाईफमध्ये तरुणाईकडे सळसळता उत्साह असतो. त्यामुळे नव्याची नवलाई व नवे ट्रेंड आत्मसात करण्याकडे कल असतो. त्याठिकाणी घरगुती गोष्टी व पारंपारीक सणाला काही वाव नसतो असे मला वाटते. प्राध्यापकांकडून प्रोत्साहन दिले जात नाही हे देखील  एक कारण  आहे. पण कॉलेजात रक्षाबंधन साजरे व्हावे  असे मला वाटते. आमचा खूप मोठा फ्रेंण्डस ग्रुप आहे. ग्रुपमधील तरुण हे आमचे संरक्षण इतरांच्या छेडछाडीपासून करीत असतातच व राखी बांधत नसले तरी त्या मागची असलेली भूमिका पार पाडत असतात. 
- अंकिता लाड, प्रगती महाविद्यालय
 
फ्रेंडशीप डे प्रमाणोच रक्षाबंधनला 
ही महत्व आहे. फ्रेंडशीपमध्ये शेअरिंग जास्त आहे. आपण एखादी गोष्ट मित्रशी जास्त शेअर करू शकतो. त्यामुळे फ्रेंडशीपला रक्षाबंधनपेक्षा जास्त महत्व आहे. रक्षाबंधन हा केवळ राखीच बांधून साजरा केला पाहिजे असे नाही. आमच्या अडीअडचणीच्या वेळी संरक्षण करणो, हेच माङया दृष्टीने खरे रक्षाबंधन आहे.
- नेहल पटेल 
 
आमच्या महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये कार्यरत असलेले अनेक तरुण हे परप्रांतीय आहेत. महाविद्यालयातील तरुणी या त्यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करतात.   हा सण मग रविवारी आला तरी सुट्टीच्या दिवशीही मुली येऊन त्यांना राखी बांधतात. यातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो. क्लासरुममध्ये रक्षाबंधन साजरा केला जात नाही. कॉलेजात फ्रेंडशीप डे व रक्षाबंधन या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन दिले जात नाही. कॉलेजात मुले  शिक्षणासाठी येतात, त्यामुळेच त्यालाच जास्त महत्व दिले जाते.
- प्रा. नितीन आरेकर, 
चांदीबाई महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख 
 

 

Web Title: Rakshabandhan in college and campus neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.