राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी

By Admin | Updated: August 10, 2016 18:10 IST2016-08-10T17:57:12+5:302016-08-10T18:10:17+5:30

प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणा-या राखी सावंतने आता त्यापुढे एक पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्र असलेला सेक्सी ड्रेस परिधान केला आहे.

Rakhi Sawant's Aangopang glimpses Modi | राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी

राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणा-या राखी सावंतने आता त्यापुढे एक पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेला सेक्सी ड्रेस परिधान केला आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाला अजून काही दिवस आहेत. 
 
आणखी वाचा 
आत्महत्या रोखायच्या असतील तर, सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत
 
पण अमेरिकेत काही दिवस आधी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमाला राखी शिकागोमध्ये वनपीस घालून उपस्थित होती. राखीच्या या तोकडया ड्रेसमध्ये अंगभर मोदींची छायाचित्रे होती. 
 
काही महिन्यांपूर्वी  प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर राखी सावंतने सीलिंग फॅनवर बंदी घालण्याची अजब मागणी केली होती. अनेकजण प्रत्युषाच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ, दु:ख व्यक्त करत असताना राखीने प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य केले होते. 

Web Title: Rakhi Sawant's Aangopang glimpses Modi