माहिती आयुक्तांच्या आदेशाविरोधात राकेश मारिया हायकोर्टात
By Admin | Updated: November 27, 2014 02:12 IST2014-11-27T02:12:12+5:302014-11-27T02:12:12+5:30
मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाविरोधात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आह़े

माहिती आयुक्तांच्या आदेशाविरोधात राकेश मारिया हायकोर्टात
मुंबई : संपूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाविरोधात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आह़े या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आह़े
मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आह़े माहिती आयुक्त हे न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊ शकत नाहीत़ चौकशीचे आदेश देणो हे माहिती आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रत येत नाही. तेव्हा न्यायालयीन चौकशीचे माहिती आयुक्तांचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आह़े
मुंबई हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती पोलीस दलाकडून मागितली होती़ यात हल्ल्याच्या दिवशीचा वायरलेस संदेश व इतर काही माहितीचा समावेश होता़ मात्र सुरुवातीला त्यांना ही माहिती नाकारण्यात आली़ नंतर ही माहिती देण्यात आली़ पण या माहितीत काही तफावत असल्याचा ठपका ठेवत विनिता यांनी याची आयुक्तांकडे तक्रार केली़ त्याची दखल घेत माहिती आयुक्तांनी निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल़े त्याविरोधात मारिया यांनी याचिका दाखल केली आह़े (प्रतिनिधी)