उल्हासनगर स्थायीच्या सभापतीपदी सेनेच्या राजश्री चौधरी

By Admin | Updated: May 7, 2014 21:52 IST2014-05-07T20:35:31+5:302014-05-07T21:52:34+5:30

उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी सेनेच्या राजश्री चौधरी विजयी झाल्या.

Rajeshree Chaudhary of the army as Ulhasnagar standing chairman | उल्हासनगर स्थायीच्या सभापतीपदी सेनेच्या राजश्री चौधरी

उल्हासनगर स्थायीच्या सभापतीपदी सेनेच्या राजश्री चौधरी

विशेष व प्रभाग समित्या बिनविरोध : राष्ट्रवादीच्या ईसरत खान यांना ४ मतांवर समाधान
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी सेनेच्या राजश्री चौधरी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या ईसरत खान यांचा १० विरूध्द ४ मतानंी पराभव केला आहे. कॉग्रेसचे दोन सदस्य तटस्थ राहिले. विशेष व प्रभाग समिती सभापती पदाची घोषणा निवडणूक अधिकारी शेखर चेन्ने यांनी केली आहे. समितीतील १६ पैकी सत्ताधारी आघाडीचे १० सदस्य तर विरोधी पक्षातील राष्ट्रवादी पक्षाचे-४ व कॉग्रेस पक्षाचे-२ सद्स्य आहेत. काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या ईसरत खान यंाना-४ तर सेनेच्या चौधरी यांना १० मते मिळाली आहे.
महापालिका प्रभाग समिती क्रं-१, च्या सभापतीपदी सेनेच्या नेहा भोईर, प्रभाग समिती क्रं-२, च्या सभापतीपदी भाजपाचे हरेश जग्यासी, प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापतीपदी भाजपाच्या जयश्री जग्यासी तर प्रभाग क्रं-४ च्या सभापतीपदी सेनेच्या मंदा सांेनकांबळे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी शेखर चेन्ने यांनी केली आहे. प्रभाग समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूका बिनविरोध झाल्या. तसेच नऊ विशेष समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक अधिकारी शेखर चेन्ने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतीपदी साई पक्षाच्या इंदिरा उदासी, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अपक्ष नगरसेवक राजेश वानखडे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी सेनेचे सुरेश जाधव, आरोग्य समितीच्या सभापतीपदी सेनेच्या अनिता भानुशाली, शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी साई पक्षाच्या अनिता तरे, गलिच्छ वस्ती समितीच्या सभापतीपदी साई पक्षाचे दिलीप जग्यासी, क्रीडा समिती सभापतीपदी भाजपाच्या माया चावला, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सेनेच्या जयश्री कांबळी, तर महसूल समितीच्या सभापतीपदी सेनेचे जयेंद्र मोरे यांच्या निवडीची घोषणा केली आहे.
स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीवेळी सेनेचे कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाल लांडगे, सेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, संपर्क प्रमुख चंद्रकांत बोडारे, राजेंद्रसिंग भुल्लर, धनंजय बोडारे यांच्यासह सत्ताधारी आघाडीतील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.
 

Web Title: Rajeshree Chaudhary of the army as Ulhasnagar standing chairman