Join us  

Rajesh Tope: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लशीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं जोरदार 'प्लानिंग'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 2:21 PM

Rajesh Tope: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करत आहे.

Rajesh Tope: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करत आहे. राज्यात जास्तीत लोकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला आणखी एक लस उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लसीसंदर्भात आज महत्वाची माहिती दिली आहे. 

राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज, केंद्रानं ऑक्सिजनची गरज भागवावी; राजेश टोपेंची मागणी

महाराष्ट्रात 'स्पुटनिक-व्ही' लसीचा साठा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा देखील केली जात आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत चर्चा करुन 'स्पुटनिक-व्ही' उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न केला जात आहे. राजेश टोपे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील 'स्पुटनिक-व्ही' लसीचा दर ठरविण्याबाबत चर्चा सुरू असल्याची महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला 'स्पुटनिक-व्ही' लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन लसी देण्यात येत आहे. पण अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्याच्या पाठपुराव्यासाठी आणखी लस जनतेला उपलब्ध होऊन जाईल याच उद्देशानं राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

महाराष्ट्रात सध्या ६ लाख ३९ हजार कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनाचा रिकव्हरी रेट ८५.५ टक्के इतका आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात लसीचा तुटवटा निर्माण होत असल्याचं देखील टोपे यांनी कबुल केलं. राज्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील एकूण १५ हजार २७४ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २८ लाख ६६ हजार इतकी आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करणारे ३८ प्लांट असून यातून ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती केली जात असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.  

टॅग्स :राजेश टोपेकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस