Join us

‘राजधानी’ने दिल्लीत पोहोचा अवघ्या १८ तासांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 02:15 IST

सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढला आहे. १५३५ कि.मी. अंतर कापण्यासाठी या गाडीला आता १९ तासांऐवजी १८ तासांचा अवधी लागेल.

मुंबई : सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढला आहे. १५३५ कि.मी. अंतर कापण्यासाठी या गाडीला आता १९ तासांऐवजी १८ तासांचा अवधी लागेल.मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारपासून राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांचा एका तासाचा वेळ वाचणार आहे. शिवाय राजधानी एक्स्प्रेसला कसारा-इगतपुरी हा घाट मार्ग पार करण्यासाठी बँकर इंजीनऐवजी पुश-पुल इंजीन लावल्यानेही वेळेची बचत होत आहे.याआधी बँकर इंजीन जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी अधिक वेळ खर्ची पडत होता. मात्र राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही दिशेला पुश-पुल इंजीन जोडण्यात आल्याने घाट मार्ग ओलांडणे सोईस्कर झाले आहे. त्यामुळे गाडीचा घाट पार करण्याचा वेगही वाढला आहे.