ठाण्यात राजस्थानचा राजवाडा
By Admin | Updated: August 29, 2014 00:36 IST2014-08-29T00:36:30+5:302014-08-29T00:36:30+5:30
‘ठाण्याचा राजा’ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या पाचपाखाडीच्या नरवीर तानाजी मित्र मंडळाने यंदा राजस्थानी राजवाडा साकारला आहे.

ठाण्यात राजस्थानचा राजवाडा
जितेंद्र कालेकर, ठाणे
‘ठाण्याचा राजा’ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या पाचपाखाडीच्या नरवीर तानाजी मित्र मंडळाने यंदा राजस्थानी राजवाडा साकारला आहे. गेल्या महिन्यापासून सुमारे ५० कामगारांच्या कलाकुसरीतून घडत असलेला महाल म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा ठरावा.
पाचपाखाडीमध्ये २६ जानेवारी १९७९ रोजी नरवीर तानाजी मित्र मंडळाची स्थापना झाली. त्याच वर्षापासून या मंडळाने गणेशोत्सवाला सुरुवात केली. आकर्षक मूर्ती, विद्युत रोषणाई आणि वैविध्यपूर्ण कलाकृतीने साकारलेला भव्य मंडप हे या मंडळाचे दरवर्षीचे वैशिष्ट्य यंदाही कायम ठेवले आहे. मंडळाला यंदा सुमारे २२ लाखांची देणगी जमा झाली आहे. यातून मंडपासाठी ५० हजार तर १२ लाखांच्या खर्चातून राजस्थानचा राजवाडा साकारण्यात येत आहे. ठाण्याच्या संदीप वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाल साकारण्यात आला आहे. हे काम करण्यापूर्वी राजस्थान, कोल्हापूर आणि जेजुरी आदी ठिकाणी वेंगुर्लेकर यांच्या टीमने भेटी दिल्या आहेत. मंडपातून हा राजवाडा साकारताना ३२ खांब उभारण्यात आले असून त्यावरही कलाकुसर करण्यात आली आहे.