Join us  

कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नका, राज ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 6:11 AM

कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा डाव रचला जात असून, त्या निमित्ताने कोकणच्या भूमिपुत्रांना भूमिहिन केले जात आहे.

मुंबई : कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा डाव रचला जात असून, त्या निमित्ताने कोकणच्या भूमिपुत्रांना भूमिहिन केले जात आहे. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरू आहेत, सावध राहा त्यांना जमिनी विकू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले.मुंबई, ठाणे व पालघर स्थित कोकणवासीय मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रवींद्र नाट्यगृहात झाला. आपले लोक कोकणातील जमिनी विकून मोकळे होत आहेत, पण एकदा जमीन हातची गेली की, कोकणातील तुमचे अस्तित्वच संपेल हे लक्षात ठेवा, असा इशारा ठाकरे यांनी दिला.कोकणातून निवडून आलेल्या आमदार, खासदारांनी कोकणकडे दुर्लक्षच केले, अशी टीका करून ते म्हणाले की, कोकणमधील जमिनी या विध्वंसक प्रकल्पांसाठी नाहीत. ती केरळसारखी आहे आणि तिथे पर्यटनाचे अनेक प्रकल्प उभे राहू शकतात. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. या भूमीसाठी पूरक प्रकल्पांऐवजी मारक प्रकल्प आणले जात आहेत. विध्वंसक प्रकल्प दुसरीकडे हलवा. एकट्या कोकणने चार भारतरत्न दिले आणि आज आम्ही कोकणवासीय फक्त गणपतीला तेथे जाऊन परत येतो. आपल्याला आपल्या भूमीचे महत्त्व कळले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.गणपतीसाठी नीट जागणपतीसाठी जाताय तर नीट जा, नीट या, अशी मिश्कील टिप्पणी रस्त्यांच्या अवस्थेबाबत करून राज म्हणाले, कोकणात नवे रस्ते बांधले जात आहेत, या आधी नवे म्हणून जे रस्ते बांधले, ते उखडले आहेत. आता कोकणात जाताना तुमच्या मणक्यांना ते कळेलच.बांधून उखडलेल्या रस्त्यांचे कंत्राटदार कोण, याचा जाब मनसे शैलीत विचारा, असे आवाहन त्यांनी केले. आकडे फेकले जातात, कामे होतच नाहीत. हजारो कोटी खर्च केले जातात, ते कंत्राटदार आणि अधिकाºयांच्या घशात घालण्यासाठी काय, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :राज ठाकरे