राज ठाकरेंनी जागवल्या वाजपेयी- अडवाणी स्मृती
By Admin | Updated: December 10, 2014 22:54 IST2014-12-10T22:54:17+5:302014-12-10T22:54:17+5:30
नासिक दौ:यापाठोपाठ तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कार्यकत्र्याचा मेळाव घेतला.

राज ठाकरेंनी जागवल्या वाजपेयी- अडवाणी स्मृती
डोंबिवली: नासिक दौ:यापाठोपाठ तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कार्यकत्र्याचा मेळाव घेतला. त्यातही प्रामुख्याने नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकावर नाराजी दर्शवली. त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान खासदार लालकृष्ण अडवाणी यांच्यासह लतादीदी, हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत कार्यकत्र्याना स्फुरण चढविले.
ते म्हणाले की, जीवनात हार-जीत ही होतच असते, मात्र त्यातून खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे रहा, हे सांगतांना त्यांनी अटलजी-अडवाणी यांची आठवण सांगितली. काही वर्षापूर्वी बाळासाहेब असतांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब, अडवाणी, लतादिदी सर्व एका व्यासपीठावर एकत्र आले होते. अडवाणींनी लतादीदींना एक गाणो म्हणायला सांगितले. त्यानुसार त्यांनी ‘ज्योती कलश छलके’ हे गाणो म्हंटले, ते एकूण अडवाणींचे डोळे भरून आले. काही वर्षानी पुन्हा एका ठिकाणी भेटल्यावर ठाकरेंनी त्यांना याबाबत विचारले, अडवाणी म्हणाले की, ज्यावेळेस जनसंघ/भाजपाचे केवळ 2 खासदार जिंकले होते, त्यावेळी अटलजींनी माध्यमांना हरण्यासारखे आता काहीच नाही असे सांगितले. त्यावेळी पक्षाची स्थिती अत्यंत मोडकळीस आलेली असतांना ते - मी एकत्र फिरत होतो, त्यावेळेस एक चित्रपट बघितला, त्यातले हे गाणो. निवडणुकीतील पराभवाच्या कटू अनुभवानंतर हा चित्रपट बघून बाहेर आल्यावर एका नव्या निश्चयाने आम्ही पुन्हा पक्ष उभा केला. त्यानंतर 99 आणि आता 2क्14 मध्ये प्रचंड यश आले,आणि आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मित्रंनो अशी ईच्छाशक्ती बाळगणो महत्वाचे आहे असे ठाकरे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, शहरप्रमुख राजेश कदम, पक्षाचे सर्व नगरसेवक, विद्यार्थी सेना, जनहित कक्ष, विभाग-उपविभागप्रमुख आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या डॉ. प्रकाश आमटेंसारखे कार्य करा, त्यांना तर एका देशाने बँकेच्या पासबुकावरुन प्रवेश नाकारला होता, मात्र त्यानंतर मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याचे समजताच धावपळ करीत त्यांना पासपोर्ट दिला होता. त्यांना कुठे लागली ओळख? आपली ओळख आपण सांगून होत नसते तर ती आपल्या कार्यातून होत असते. राजन मराठेंसारखा जनसंपर्क हवा : मी सतत येईनच, जानेवारीतही येईन. परंतू मित्रंनो जनसंपर्क दांडगा करा, तो दिसत नाही. येथील नगरसेवक राजन मराठे याने ज्या प्रमाणो ‘कोणाच्याही वाढदिवसाला ग्रिटींग पाठवण्याचा उपक्रम केला आहे’ असे लोकाभिमुख उपक्रम राबवा, असे कार्य करा की जेणोकरुन समाजाला तुमची दखल घ्यावी लागेल, त्यात मराठेंच्या नावाचा उल्लेख करावासा वाटतो असेही ठाकरे म्हणाले.