प्रचाराचा निर्णय राज ठाकरे घेणार - कोटेचा

By जयंत होवाळ | Updated: May 1, 2024 20:36 IST2024-05-01T20:35:20+5:302024-05-01T20:36:05+5:30

कोटेचा यांनी अमित ठाकरे यांचीही भेट घेतली.

Raj Thackeray will decide the campaign says Kotecha | प्रचाराचा निर्णय राज ठाकरे घेणार - कोटेचा

प्रचाराचा निर्णय राज ठाकरे घेणार - कोटेचा

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत प्रचाराला येण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे घेतील, असे उत्तर-पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले. त्यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. आजच्या भेटीत त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पाठिंबा आणि मार्गदर्शन घेतले. मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने आम्हाला ऊर्जा मिळाली आहे आणि आम्हाला खात्री आहे की, मतदार आम्हाला निवडणुकीत आशीर्वाद देतील, असे कोटेचा म्हणाले. यावेळी कोटेचा यांनी अमित ठाकरे यांचीही भेट घेतली.

गेल्या काही दिवसांत मनसेच्या नेत्यांनी पक्षाचा प्रभाव असलेल्या भांडुप आणि विक्रोळी भागात प्रभाग आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या. मनसेप्रमुखांनी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर या बैठका झाल्या. भाजपचे उमेदवार कोटेचा यांना मोठ्या फरकाने विजय मिळवून देण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. सकाळी कोटेचा यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Web Title: Raj Thackeray will decide the campaign says Kotecha