Join us  

राज ठाकरे मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून जेवतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 7:30 AM

यापूर्वी नाशिकमधील मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या साधेपणाचा अनुभव आला होता. त्यावेळी राज यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. 

मुंबई: गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची झालेली वाताहत आणि संघटनेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. पालघरमधील जाहीर सभेने राज यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात झाली. सध्या ते पालघर जिल्ह्यात कार्यकर्त्यांसह फिरत आहेत. त्यावेळच्या एका छायाचित्रामुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. राज यांच्या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यानिमित्ताने मनसे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा साधेपणा अनुभवता आला. या छायाचित्रात राज एका मनसैनिकाच्या घरी अगदी जमिनीवर मांडी घालून जेवायला बसल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या कुंतल या गावात ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी खाली बसून जेवले. रवी जाधव यांचे घर आदिवसी पाड्यात आहे, तिथे जाऊन रवी जाधव यांची भेट घेऊन राज ठाकरे जेवले. या फोटोत त्यांच्या शेजारी बाळा नांदगावकरही दिसत आहेत. तर मनसेचे इतर नेतेही या फोटोत दिसत आहेत. यापूर्वी नाशिकमधील मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या साधेपणाचा अनुभव आला होता. त्यावेळी राज यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे