राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीत!

By Admin | Updated: October 4, 2014 22:53 IST2014-10-04T22:53:36+5:302014-10-04T22:53:36+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण-डोंबिवलीतील कार्यकत्र्यानी लगबगीने तारीख मिळवत राज यांची पहिली सभा डोंबिवलीत असल्याचे जाहिर केले.

Raj Thackeray Dombivali on Monday! | राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीत!

राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीत!

>डोंबिवली : ‘राज-उद्धव यांची तारीख पे तारीख’ या आशयाचे वृत्त लोकमत मध्ये प्रसिद्ध होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण-डोंबिवलीतील कार्यकत्र्यानी लगबगीने तारीख मिळवत राज यांची पहिली सभा डोंबिवलीत असल्याचे जाहिर केले. 
सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता येथील डीएनसी मैदानावर त्यांची मुलूख तोफ डागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळची ही निवडणूक प्रचाराची सभा मात्र ‘चिकन सूप - वडय़ावर’ गाजणार नसल्याचेही मनसैनिकांनीच स्पष्ट केले. त्यासंदर्भात राज यांना येथिल स्थानिक पदाधिका:यांनी स्थानिक समस्यांची जंत्रीच पाठवली आहे. त्यामध्ये वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, गैरसोयी, समस्या आदींचा समावेश असून त्या सर्व मुद्यांना अनुसरून विकासाभिमूख बोलावे असेही स्पष्ट संदेश देण्यात आले आहेत. म्हणुनच राज यांच्या मनातील ब्ल्यूप्रिंटसह कल्याण-डोंबिवली परिसरातील हाजीमलंग पटय़ाचा विकास, येथिल प्रदूषणाची समस्या आदींसह अनेकविध विकास मुद्यांवर भाष्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत एमआयडीसीच्या मैदानावर राजू पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या चिकन सूप- बटाटे वडय़ांची आठवण सांगितल्याने लोकसभेचे गणित पूर्णत: फसले होते. जेणोकरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे कोणतेही मुद्दे नकोत असे स्पष्ट संकेत येथिल पदाधिका-यांनी वरिष्ठांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Raj Thackeray Dombivali on Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.