Join us  

Raj Thackeray: काँग्रेसच्या सचिन सावंतांनी सांगितला 'किआन' नावाचा अर्थ, भाग्यशाली क्रमांक 8

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 7:21 PM

Raj Thackeray: अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला होता

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं. ठाकरे कुटुंबात आगमन झालेल्या नव्या पाहुण्याचं नामकरण किआन ठाकरे असं करण्यात आलं आहे. शिवतीर्थवर आज अमित ठाकरे यांच्या तान्हुल्याचा नामकरण सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर, अनेकजण किआन या नावाचा अर्थ शोधू लागले. आता, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किआन नावाचा अर्थ सांगितला आहे.

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. अमित-मिताली यांना पुत्ररत्न झाल्यापासून 'शिवतीर्थ'वर एक वेगळाच आनंद व्यक्त होत आहे. मुंबईतचराज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. राज यांच्या नातवाचे नामकरण होताच, अनेकांनी किआन या शब्दाचा अर्थ गुगलवर आणि इतरत्र शोधून काढला. अनेकांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले. आता, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करुन किआन नावाचा अर्थ समजावून सांगितला आहे. तसेच, किआनला आर्शीर्वादही दिला आहे.  

छोट्या गोड किआन ठाकरेला खूप खूप आशिर्वाद!"किआन" हे नाव ही फार छान! गुगल या नावाचे मूळ पर्शियन/ हिब्रू दाखवत आहे. मराठी भाषा तशीही अनेक भाषांतील शब्दांनी समृद्ध झाली आहे. सर्वसमावेशकता हे या भाषेचे अंगच नाही का?, असे म्हणत किआन शब्दाचा अर्थही सावंत यांनी शेअर केला आहे. 

2.5 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.

किआन नावाचा नेमका अर्थ

'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे.  किआन हे मूळ संस्कृत नाव असून याचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. किआन हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे. 

टॅग्स :राज ठाकरेकाँग्रेससचिन सावंतमुंबई