Join us  

मनसेची 'तपपूर्ती'; राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 'इंजिना'ची पुढची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 1:24 PM

मनसेच्या स्थापनेला आज १२ वर्षं पूर्ण झाली. पण वर्धापनदिनाच्या सोहळ्यात राज यांनी कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही.

मुंबईः गेली १२ वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे घेऊन लढणाऱ्या आणि 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा अजेंडा काय असेल, त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.  

मनसेच्या स्थापनेला आज १२ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली, पण कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही. १८ तारखेला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असं राज यांनी स्पष्ट केलं. १८ तारखेला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणं गरजेचं आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले. 

सदस्य नोंदणी अभियानावरून राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला. आपली सदस्य नोंदणी इतर राजकीय पक्षांसारखी बोगस नसेल. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून काही होणार नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का, असा टोला त्यांनी हाणला. 

टॅग्स :मनसे गुढीपाडवा मेळावामनसेराज ठाकरे